Archive

Posts Tagged ‘Marathi’

..कधीकाळी..

December 15, 2011 8 comments

अर्धवट तुटून पडलेली ती हिर्वटलेली भिंत, केशरी-तपकिरी पानांचा तो एकेकाळी छोट्टासा असणारा अवाढव्य ढिगारा, विसरलेल्या आठवणींना कोंडून ठेवणारे ते जुनाट से झालेले दार, अध्न मध्न हलक्या मंद वाऱ्याने आपटत वाजणारी ती लाकड़ी खिड़की, वर्षांपासून धूळ खात पडलेली ती फाटकी पतंग, गच्चीवर जुन्या कुलर चे  गंज्लेले त्या जाळ्या,    एकेकाळी प्रसन्न असणारं ते उन्हात एक्ट स उभं आम्ब्याच झाड, मातीने झाक्लेली ती नाहीशी झालेली पाउलवाट आणि त्याच्या अखेरी मान राखत अजुनही उभी ती दोन मजलि इमारत. पण लहानपण पासून सर्वेच त्या जागेला “वाडा” म्हणत. वरच्या खालच्या जिन्यांवर मोजून सहा कुटुंब राहत असे आजीने कधीकाळी सांगितले होते.  घरांच्या दारान मधील अंतर पाहून असे वाटे कि गेली कित्येक वर्ष ती सगळी कुटुंब सोबतच असावीत. सण, लग्न, वाढदिवस, वर्षगाठी – आणि अश्याच कित्येक तरी आठवणी सगळ्यांच्या एकाच, पण तरीही खाजगी असाव्यात.

दिवाळीत निरनिराळ्या रांगोळ्या बनव्ण्यारा त्या लहान सहान छकुड्या आणि त्यांच्या उत्साहात भर पाडत त्यांच्या आया, चिवडा लाडू चकल्या आणि आंबट गोड लागणारे ते डब्यात ठेवलेले फरसाण लपून खाणारी चिमुकली कार्टी,  वहीचे कागद फाडून, वडलांचे फटके खाऊन, जिद्दीने बनविलेले ते आकाश कंदील, मग त्यावर रंग नसल्यामुळे आईचा ओरडा खात तिखट हळद पाण्यात घासू घासू त्यास लाऊन प्रदर्शनास बाहेर लावणारे तीच थोर्ल्यांची टोळी, आणि जास्त फटाके नसले तरी देखील मातीच्या त्या किल्ल्यांमध्ये दिवे लाऊन आनंद साजरा करणारी वाड्यातली मंडळी सहजच डोळ्यांसमोर दिसते. तेव्हा तुळशी विवाहाच्या आनंदात लहानांची उडी मारत मारत ज्येष्ठ  मंडळींना  “आजोबा तुळशीचे लग्न झाले” अशी बातमी पोहचविणे सुद्धा आजीच्या शब्दांतूनच  बघता येते.

डाकवाला कधी आपल्या दिशेने येतोय एवढेच बघत बसत तासं तास घालविणारी ती पोट्टी नेहमी त्याच्या कडन सायकल ची एक चक्कर मागायला कधीच चुकत नसे. बेल बॉटम घालून हातात आठ आणे घेऊन मोठ्या थाटात stall च्या तिकिटात सुदामा टाकीज मध्ये सिनेमा बघणारी ती मुलींची टोळी आणि “त्यात तुझी आई आणि मावशी” असे सांगून आजी आईला आजसुद्धा चक्क लाजवीते. जवळ झेंडा चौकातले ते गजानन महाराजांचे देऊळ, त्याच्यात आजीचे असंख्य असणारे ते सखी ( पारायण मंडळी, कीर्तन मंडळी, पालखी सदस्य, गुरुवारचा  नैवेद्य करणारी मंडळी) आणि आणखी समोर असलेले लक्ष्मी नारायणाचे देऊळ आणि तिथल्या आणखी सखी सई संध्याकाळी नित्य नेमाने भेटत. परत येतांना विदर्भ बुक डेपो मध्ये डोकाऊन समर्थ रामदासांची पोथी किवा दासबोध किवा असे काही चाळत चाळत घरच्या दिशेने यायचे. येतांना मात्र जोशी मंगल कार्यालय जवळ असणाऱ्या भाजीवाल्या कडून भरताची वांगी, कोबी, एखाद जुडी मेथी, पालक, कोथिंबीर, मिरच्या आणि मुख्य म्हणजे बीड्याची पान असा बाजार करत यायचं.

कळत नकळत, दिवस, दिवसांचे महिने आणि महिन्यांचे वर्ष त्या रोजच्या गोष्टींची फक्त एक गोड, अविस्मरणीय आठवण होऊन गेले. बेहेरे काकुंच “नरड भरे पर्यंत खाऊन घ्या लेकांनो, मग जर भूक भूक केली तर गाल रंगाऊन काढेल” हे बोलण, पोकळ्या भिंतांमध्ये हरवून गेल. त्या चिल्लर पार्टीची उन्हाळ्यातली सावली असलेली ती विहीर एकटेपणाने “भरून” गेली. गेल्या त्या पारायण कीर्तनाच्या मंडळी आता रेशीम बागेत राहायला, आणि एकटे पडले हाती चिलीम घेउनी, संत आमुचे ते गजानन. डाकवाल्याचा मुक्काम पोष्ट आता सापडत नाही आणि हरवल्या त्या गोंगाटात सायकल च्या सुमधुर घंट्या. म्हणे प्रगती झाली. कुटुंब सर्वे नागपुरात बिखरले. आजोबांनी मात्र बाजूचीच जमीन घेऊन घर बांधले. येतात कधी, कुणी आठवण काढत भेटण्यास आजीला. मग निघतो पाटाखालन तो आठवणींचा गोल डबा. निघतात बिड्याची पान, अडकित्ता, ओलसर सुपारी, लवंगा आणि थोडा चुना. कधी लग्नाच्या पत्रिका, कधी नातवंडांची बातमी तर कधी दिवाळी चा तो आंबट गोड फराळ आणि करंज्या, कारणे कधीही कमी पडत नाही परत यायला.  बोलतात बरेच बदलले.

जणू सगळेच बदलले. रस्ते, रहदारी, ईमारती. लोकही. पण नाही बदलला फारसा तो वाडा. शांतपणे उभा राहून पाहतो तो आजू बाजूचे बदल. टाकून दिलेल्या त्या अचेत गोष्टीन मुळे अजूनही जिवंत असणारा तो स्थिर सा वाडा . आजही वाट बघतो त्या गेलेल्या वेळेची. आणि वाट बघतात ते जुने कुटुंब, वाड्यात्न येणाऱ्या रुपयाची.

Advertisements
Categories: Abstract Tags: ,